Lok Shahi Times https://lokshahitimesnews.com Lok Shahi Times News Sun, 09 Aug 2026 12:36:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.2 जालना महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे मोठे पाऊल सभापती सौ संध्या संजय देठे यांचे मोठे पाऊल.. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae/ Sun, 09 Aug 2026 12:36:24 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2700

जालना जिल्हा प्रतिनिधी- सय्यद इलियास

बालस्नेही प्रभाग योजना’ प्रभावीपणे राबवणार

जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे यांनी बालस्नेही प्रभाग योजना संदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, प्रत्येक मुलाला सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी आणि विकासासाठी पोषक वातावरण मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

मनपा महापौर सौ. वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रभागातील बालकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.या योजनेअंतर्गत सुरक्षित खेळाची मैदाने, स्वच्छ व आरोग्यदायी परिसर, दर्जेदार शिक्षण, पोषण, आरोग्य सुविधा तसेच बालहक्कांबाबत जनजागृती अशा विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

यावेळी सौ. संध्या संजय देठे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, मुलांचा सर्वांगीण विकास ही केवळ शासन किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे.प्रभागातील बालकांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या सूचना प्रशासनाकडून विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी तसेच नागरिकांनी आपल्या सूचना आणि समस्या महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. बालस्नेही प्रभाग योजना ही जालना शहरातील मुलांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, प्रत्येक पालकाने या योजनेची माहिती जाणून घेऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे यांनी केले.

]]>
जालना जिल्ह्यातील रेशीम बाजार पेठ निर्माण व्हावे माझे स्वप्न होते रेशीम कोष बाजारपेठ इमारत आमदार खोतकर यांची पाहणी. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ae/ Sun, 09 Aug 2026 08:19:06 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2683

जालना : जालना शहरातील बहुप्रतीक्षित रेशिम बाजारपेठ व प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते रेशिम बाजारपेठ व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड , जिल्हा रेशीम अधिकारी मोहीते यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा, बांधकामाची स्थिती, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच कार्यक्रमस्थळाची व्यवस्था याबाबत आ. खोतकर यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी बोलताना आ. अर्जुनराव खोतकर म्हणाले की, “मी वस्त्रोद्योग राज्यमंत्री असताना राज्यातील पहिली रेशिम बाजारपेठ जालना येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून घेतली आणि इमारत व बाजारपेठेच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. बाजारपेठेची इमारत पूर्ण होऊन आता स्वतःच्या मालकीच्या जागेत रेशिम बाजारपेठ सुरू होत आहे, हे माझे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले. जालना येथे रेशिम बाजारपेठ सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना खोतकर म्हणाले की, यापूर्वी राज्यातील व जालना जिल्ह्यातील रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी राज्यात रेशिम बाजार पेठ नसल्यामुळे कर्नाटक राज्यातील बंगळुरूजवळील रामनगर येथे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. ही अडचण लक्षात घेऊन जालना येथेच रेशिम बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन रेशिम बाजारपेठेच्या इमारतीमध्ये रेशिम खरेदी-विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाहेरून रेशिम विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली असून, तब्बल आठ खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यासह परिसरातील रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना या बाजारपेठेचा मोठा फायदा होणार आहे. आ. खोतकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. उद्घाटन सोहळा यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा रेशिम अधिकारी मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे, तहसीलदार राजू निहाळ, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, माजी सभापती पांडुरंग डोंगरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आप्पा अवघड, माजी सभापती गोपीकिशन गोगडे, पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी, सरपंच रवींद्र ढगे, बालाजी पवार, किशोर विटेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना येथे रेशिम बाजारपेठ सुरू झाल्यामुळे रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील रेशिम उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ही बाजारपेठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास, लोकशाही टाईम्स.

]]>
आमदार अर्जुन खोतकर व मा. मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने आमदार लोणीकर व माजी आमदार राजेश टोपे यांचे मनोमिलन.. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82/ Thu, 06 Aug 2026 07:13:57 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2674

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकेत राहुल लोणीकर अध्यक्ष तर राजेश टोपे यांच्या वतीने सौ. निर्मल मरकड यांची उपाध्यक्ष पदी निवड.

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. राहुल लोणीकर यांची, तर उपाध्यक्षपदी माजी आमदार राजेश टोपे यांच्या गटाकडून सौ. निर्मला मरकड यांची सर्वानुमते निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रावसाहेब दानवे व आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार राजेश टोपे हे आमदार खोतकर यांच्या दर्शना बंगला येथे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

या घडामोडीकडे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचा राजकीय संदेश म्हणून पाहिले जात असून, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आणि समन्वय वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षपदी आणि सौ. निर्मला मरकड यांच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

जालना जिल्हाच्या विकासासाठी राजकीय मतभेत बाजूला ठेवून एकत्र आलो आहे अशी प्रतिक्रिया दोघांच्या वतीने देण्यात आली. या वेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : सय्यद इलियास: 8308302662

]]>
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a5%8d/ Sun, 07 Jun 2026 09:20:28 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2662

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जिल्हा प्रशासनात खळबळराज्यातील भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया अधिक तीव्र करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी मोठी कारवाई केली. जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू उत्खनन प्रकरणातून कारवाईमिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन व ट्रक सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा लावण्यात आला. कारवाईदरम्यान विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर येथील विजय चव्हाण यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. सापळ्यादरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये चर्चांना उधाण आले आहे.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईनंतर आवश्यक पुरावे जप्त केले असून संबंधित पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे धाड टाकून एका पोलीस अंमलदाराला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यामुळे एका दिवसात दोन वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवायांनी भ्रष्टाचारविरोधातील एसीबीची मोहीम आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात एसीबीकडून सातत्याने सापळे रचून लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर झालेली ही कारवाई जालना जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या लाचखोरीच्या कारवायांपैकी एक मानली जात आहे, काही महिन्यापूर्वी जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एका बांधकाम ठेकेदाराकडून 10 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते, आणि आता हे तहसीलदार विजय चव्हाण अडकले या मुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्येही या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाद मिटवणारा तहसीलदार, गोरगरिबांना मदत करणारा तहसीलदार, पूर आल्यावर पुराच्या पाण्यात स्वतः पूर्वग्रस्तांना अन्न पुरवणारा तहसीलदार आज लाच खोरीत अडकल्याने विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

]]>
जालना शहरातील पावसाळी समस्यांवर आमदार अर्जुन खोतकर व मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची महत्त्वपूर्ण बैठक https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae/ Tue, 12 May 2026 06:21:35 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2646

Jalna : जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास | आज जालना महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर जालना शहरातील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील ड्रेनेज लाईन नियोजन, पावसाळ्यात विविध भागांत पाणी साचणे, ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीत जालना शहरातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील प्रलंबित कामे, पावसाळ्यातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यासंदर्भात आयुक्तांसमोर मते मांडली.आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल खोतकर, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक संजय डुकरे पाटील, नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक योगेश भगत, नगरसेवक अश्विन आंबेकर तसेच मनपाचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हाही बैठक जालना शहराच्या विकासासाठी व पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

]]>
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” सेवली–नेर मार्गावर नागरिक हैराण, जीव मुठीत धरून प्रवास! https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%8d/ Wed, 22 Apr 2026 12:45:18 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2639

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्ह्यातील सेवली ते नेर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल अक्षरशः शब्दात मांडता येणार नाहीत. “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, वाहन चालवताना चालकांना प्रत्येक क्षणी अपघाताची भीती सतावत आहे. दुचाकीस्वार तर सर्वाधिक त्रस्त असून, अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दररोज शाळकरी विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, तसेच रुग्णवाहिका या मार्गावरून जात असतात. मात्र खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्ता दुरुस्तीचे काम फक्त कागदावरच होते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Facebook Channel Link https://www.facebook.com/share/v/14gYmPWpE8u/

तात्काळ उपाययोजना केली पाहिजे अशी नागरिकांच्या वतीने मागणी केली जात आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

]]>
रामनगर (जालना) येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पार पडले. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8/ Sat, 18 Apr 2026 15:03:58 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2632

जालना शहरातील रामनगर येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.

आज आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “संपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे केंद्र नसून सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी आमदार खोतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी अधिक जवळीक साधता येईल आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यास गती मिळेल, असे मत मांडले.

कार्यक्रमाला शिवसेना संपर्कप्रमुख पंडित दादा पाटील, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, किशोर पांगरकर, संजय डुकरे पाटील तसेच नजीर भाई, डॉ. नेमाने, मुसा परसुवाले, इरशाद भाई, विजयाताई चौधरी, उज्वलाताई खोकल्या, हरीश देवावाले, जावेद भाई, जबर भाई, स्वप्निल हिवराळे, फकीरा वाघ, सुशील भावसार, भोला कांबळे, लखन कनिसे, संतोष रासवे, नरेश भैया, खुद भैय्या, स्वप्नील घुले, दीपक हवाले, सखाराम लंके आदींसह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्घाटन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला असून, या संपर्क कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

]]>
पुण्यातून खास मतदानासाठी अंबडला आलेल्या तरुणाचा आरोप : “माझ्या नावाने आधीच बोगस मतदान!” https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ Tue, 02 Dec 2025 09:37:10 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2620

लोकशाही टाईम्स – विशेष रिपोर्ट अंबड | अंबड नगरपरिषद मतदार प्रकरण 🗳 पुण्यातून खास मतदानासाठी अंबडला आलेल्या तरुणाचा आरोप : “माझ्या नावाने आधीच बोगस मतदान!”अंबड – लोकशाहीच्या महत्त्वाच्या उत्सवाला आज सकाळी गंभीर धक्का बसला, जेव्हा पुण्यात कार्यानिमित्त राहत असलेले आनंद बळीराम शिंदे नावाचे तरुण मतदार केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मूळ गावी अंबड येथील मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांना “तुमचे मतदान आधीच झाले आहे” असे सांगण्यात आले आणि तेथूनच गोंधळाची सुरुवात झाली.📍 “मी अजून मतदानच केलेले नाही… मग माझे नाव कोणी वापरले?” – शिंदे यांची प्रतिक्रिया आनंद शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या नाराजीचा कडाडून उल्लेख केला. ते म्हणाले—> “मी सकाळपासून फक्त मतदान करण्यासाठी पुण्यातून अंबडला आलो आहे. माझ्याकडे माझे मतदार कार्ड आहे. पण मी मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच कोणीतरी माझ्या नावाने बोगस मतदान केलं आहे. माझ्या हातावर कुठेही शाई नाही, मग मतदान केल्याचे कसे म्हणतायत?”**त्यांनी स्वतःचा हात दाखवत स्पष्ट केले की, त्यांच्यावर मतदानाची शाई नसताना अधिकारी त्यांचे मतदान झाल्याचे सांगत आहेत हे अत्यंत संशयास्पद आहे.📍 अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया : “वरिष्ठ येतील, थांबा”**या प्रकरणाबाबत चौकशी करताच उपस्थित मतदान अधिकाऱ्यांनी शिंदे यांना थांबण्यास सांगितले व वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे सांगितले.मात्र शिंदे यांना दीर्घकाळ थांबणे शक्य नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रीय व संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते संतप्तपणे म्हणाले—E> “इथे काय व्हेरिफाय करत आहात? मी अजून मतदान केलेलंच नाही. मग माझं मतदान झालं कसं दाखवताय?”📍 निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेवर मोठा प्रश्न या घटनेमुळे मतदान केंद्रातील व्यवस्थापन व सुरक्षेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.मतदारांच्या ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले असून, बोगस मतदानावर नियंत्रण ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.📍 स्थानिक नागरिकांचाही संताप या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “जर स्वतःची ओळखपत्र आणि हातावर शाई नसतानाही मतदान झालं दाखवलं जात असेल, तर खरे मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 📍 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची नोंद घेतली जाण्याची शक्यता असून बोगस मतदान करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज, मतदान नोंदी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे निवेदन तपासले जाणार असल्याची चर्चा आहे.

🔚 लोकशाही टाईम्स निष्कर्ष बोगस मतदानाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी अशा घटनांवर तात्काळ व कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.आनंद शिंदे यांचे प्रकरण हे मतदान व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.🗳 लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी ‘खरे मतदार – खरे मतदान’ याची काळजी प्रशासनाने तत्परतेने घ्यावी, हीच नागरिकांची अपेक्षा.

]]>
प्रभाग ७ मध्ये दिवाळी किट वाटप युवासेना “शहरप्रमुख कमलेश खरे यांचा उपक्रम — स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटला” https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/#comments Wed, 05 Nov 2025 11:18:55 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2607

जालना जिल्हा प्रतिनिधी -: आज प्रभाग ७ मध्ये दिवाळी किट वाटप युवासेना “शहरप्रमुख कमलेश खरे यांचा उपक्रम — स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटला”प्रभाग क्रमांक 07 युवासेना शहरप्रमुख कमलेश खरे यांच्या वतीने स्वच्छता कामगारांना दिवाळीनिमित्त किराणा किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित स्वच्छता कर्मचारी व प्रभाग क्रमांक ०७ मधील नागरिकांशी बोलताना युवासेना शहरप्रमुख कमलेश खरे म्हणाले की, आपल्या प्र.क. ०७ प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरता मी सदैव तत्पर आहे व आपला प्रभाग विविध उपक्रम राबवून आपल्या प्रभागाला प्रगतीच्या दिशेने निघण्यासाठी मी विकास आराखडा तयार केला आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाला नरेशभैया खुदभय्ये, स्वच्छता निरीक्षक अमजद खान, करण मगर पाटील, कैलाश खताळे, विशाल जाधव पाटील, महेश शिंदे पाटील, आकाश खरे तसेच सर्व स्वच्छता कर्मचारी व प्रभाग क्रमांक सात मधील महिला भगिनी व पुरुष मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थित होते

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/feed/ 2
पुसेगाव सर्कलमध्ये शिवसेना पक्षाकडून गजानन पोहकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/#respond Sun, 02 Nov 2025 12:37:45 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2599

आज पुसेगाव सर्कलमध्ये लहान मूल असो वा वृद्ध नागरिक — “गजानन भाऊ” हे नाव परिचयाचं झालं आहे. त्यांच्या नावाभोवती लोकांचा आत्मीयतेचा भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षाने गजानन पोहकर यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास, त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे.येत्या निवडणुकीत पुसेगाव सर्कलमधील राजकारणात गजानन पोहकर हे एक निर्णायक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते सर्कलमधील राजकीय समीकरणांमध्ये एक महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

गेल्या काही वर्षांत त्यांनी सर्कलमधील गावोगाव फिरून नागरिकांच्या समस्या ऐकल्या, शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शक्य तेथे मदत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यामुळे त्यांनी केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही आपले स्थान निर्माण केले आहे.स्थानिक नागरिक सांगतात की, “गजानन भाऊ हे नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. त्यांनी कुणाचं दार बंद केलेलं नाही. आज सर्कलमधील प्रत्येक घरात त्यांचं नाव घेतलं जातं.”अनेक तरुणांनी त्यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत राजकारणात आणि सामाजिक कामात पाऊल टाकलं आहे.शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही गजानन पोहकर यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा जम बसलेला जनसंपर्क, विनम्र स्वभाव आणि पक्षनिष्ठ कार्यपद्धती पाहता वरिष्ठ पातळीवरही त्यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, गजानन पोहकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण त्यांनी केवळ राजकीय पातळीवर नव्हे, तर सामाजिक स्तरावरही विश्वास निर्माण केला आहे. त्यांची लोकांशी असलेली थेट नाळ, प्रत्येक घटकांशी असलेला संपर्क आणि प्रामाणिक कार्य हे त्यांचे मुख्य बळ आहे.आज पुसेगाव सर्कलमध्ये लहान मूल असो वा वृद्ध नागरिक — “गजानन भाऊ” हे नाव परिचयाचं झालं आहे. त्यांच्या नावाभोवती लोकांचा आत्मीयतेचा भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षाने गजानन पोहकर यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास, त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/feed/ 0