Jalna Shahar Batmi – Lok Shahi Times https://lokshahitimesnews.com Lok Shahi Times News Tue, 12 May 2026 12:13:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 जालना शहरातील पावसाळी समस्यांवर आमदार अर्जुन खोतकर व मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची महत्त्वपूर्ण बैठक https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae/ Tue, 12 May 2026 06:21:35 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2646

Jalna : जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास | आज जालना महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर जालना शहरातील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील ड्रेनेज लाईन नियोजन, पावसाळ्यात विविध भागांत पाणी साचणे, ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीत जालना शहरातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील प्रलंबित कामे, पावसाळ्यातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यासंदर्भात आयुक्तांसमोर मते मांडली.आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल खोतकर, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक संजय डुकरे पाटील, नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक योगेश भगत, नगरसेवक अश्विन आंबेकर तसेच मनपाचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हाही बैठक जालना शहराच्या विकासासाठी व पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

]]>
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” सेवली–नेर मार्गावर नागरिक हैराण, जीव मुठीत धरून प्रवास! https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%8d/ Wed, 22 Apr 2026 12:45:18 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2639

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्ह्यातील सेवली ते नेर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल अक्षरशः शब्दात मांडता येणार नाहीत. “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, वाहन चालवताना चालकांना प्रत्येक क्षणी अपघाताची भीती सतावत आहे. दुचाकीस्वार तर सर्वाधिक त्रस्त असून, अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दररोज शाळकरी विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, तसेच रुग्णवाहिका या मार्गावरून जात असतात. मात्र खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्ता दुरुस्तीचे काम फक्त कागदावरच होते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Facebook Channel Link https://www.facebook.com/share/v/14gYmPWpE8u/

तात्काळ उपाययोजना केली पाहिजे अशी नागरिकांच्या वतीने मागणी केली जात आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

]]>
दिवाळीच्या मुहूर्तावर आमदार अर्जुन खोतकर यांनी केली पूरग्रस्त कुटुंबीयांची दिवाळी गोड https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae/#comments Mon, 20 Oct 2025 07:24:12 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2536

दिवाळीच्या मुहूर्तावर आमदार अर्जुन खोतकर यांनी केली पूरग्रस्त कुटुंबीयांची दिवाळी गोड

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास: जालना शहरात शिवसेनेच्या वतीने दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तूंचं वितरण करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना शहरातील अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर मानवी संवेदनांना उजाळा देत शिवसेनेच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, रहिम नगर, लक्कडकोट, बसस्टँड परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक वस्तूंचं वितरण करून त्यांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पसरवण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं.या प्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले,> “शिवसेना नेहमीच गरीब आणि दिनदुबळ्या लोकांसोबत उभी राहिली आहे. पूरग्रस्तांना मदत करून त्यांच्या आयुष्यात थोडा आनंद आणणं हे आमचं कर्तव्य आहे. ही संसारकिट दिवाळीला सुख-समृद्धी आणणारी ठरेल.”

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, उपजिल्हाप्रमुख नजीरभाई फिरोज अली मौलाना, मिर्झा अन्वर बेग, संतोष चौधरी, पांडूशेठ खैरे, सर्जेराव वाघमारे, किरण कांबळे, रितेश चौधरी नवमहालकर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae/feed/ 1