HomeBlogगोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जल्लोषात संपन्न

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जल्लोषात संपन्न

बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा उत्साहात पार पडला.पारंपरिक रितीरिवाज, भगव्या पताक्यांची उंच फडकवणूक आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या भव्य मेळाव्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हजेरी लावली. तसेच मुंडे कुटुंबाच्या राजकीय वारशाशी निगडीत असलेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर शिस्तबद्ध आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक शस्त्रपूजा तसेच कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या. मुंडे कुटुंबाचे विचार, गोपीनाथ गडाचा इतिहास आणि आगामी राजकीय दिशा याबाबत या मेळाव्यात चर्चा रंगली.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा उल्लेख करून ‘गड हा केवळ श्रद्धास्थान नसून जनतेच्या हक्कांच्या लढ्याचा आधार आहे’ असे भावनिक उद्गार काढले.दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावरचा परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. हजारो कार्यकर्ते, नागरिक, महिला आणि युवा वर्गाने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES

Most Popular