
Jalna : जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास | आज जालना महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर जालना शहरातील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील ड्रेनेज लाईन नियोजन, पावसाळ्यात विविध भागांत पाणी साचणे, ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत चर्चा झाली.





बैठकीत जालना शहरातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील प्रलंबित कामे, पावसाळ्यातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यासंदर्भात आयुक्तांसमोर मते मांडली.आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल खोतकर, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक संजय डुकरे पाटील, नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक योगेश भगत, नगरसेवक अश्विन आंबेकर तसेच मनपाचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हाही बैठक जालना शहराच्या विकासासाठी व पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.





