
जालना, जिल्हा प्रतिनिधी दि. ४ ऑक्टोबर: आज मा. मुख्यमंत्री १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आज जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा (गट क व गट ड) उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक-टंकलेखन संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले.या ऑनलाईन मेळाव्याला अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होत. या प्रसंगी बोलताना त्यांनी सर्व नव नियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉल द्वारे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जालना जिल्हा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.“नियुक्ती हे अंतिम यशाचा टप्पा नसून सुरुवातीचा टप्पा आहे. आपण ज्या जबाबदारीसाठी नेमणूक मिळवली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडताना सामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन कार्य करणे गरजेचे आहे, आपल्या सेवेतील दिवस हे लोकांच्या समस्या सोडुन आपल्या नियुक्तीचे खरे यश संपादन करणे” असे मार्गदर्शन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केले.या प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, प्रभारी सीईओ शिरीष बनसोडे, उपजिल्हाधिकारी रिया मेत्रेवार, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, सविता चौधर, तुबाकले सर, तसेच अनुकंपा ( गट क, व गट ड, ) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक टंकलेखन संवर्गातील उमेदवार संबंधित सर्व उमेदवार उपस्थित होते.





