HomeBlogरामनगर (जालना) येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते...

रामनगर (जालना) येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पार पडले.

जालना शहरातील रामनगर येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.

आज आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “संपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे केंद्र नसून सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी आमदार खोतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी अधिक जवळीक साधता येईल आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यास गती मिळेल, असे मत मांडले.

कार्यक्रमाला शिवसेना संपर्कप्रमुख पंडित दादा पाटील, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, किशोर पांगरकर, संजय डुकरे पाटील तसेच नजीर भाई, डॉ. नेमाने, मुसा परसुवाले, इरशाद भाई, विजयाताई चौधरी, उज्वलाताई खोकल्या, हरीश देवावाले, जावेद भाई, जबर भाई, स्वप्निल हिवराळे, फकीरा वाघ, सुशील भावसार, भोला कांबळे, लखन कनिसे, संतोष रासवे, नरेश भैया, खुद भैय्या, स्वप्नील घुले, दीपक हवाले, सखाराम लंके आदींसह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्घाटन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला असून, या संपर्क कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular