
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकेत राहुल लोणीकर अध्यक्ष तर राजेश टोपे यांच्या वतीने सौ. निर्मल मरकड यांची उपाध्यक्ष पदी निवड.
जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. राहुल लोणीकर यांची, तर उपाध्यक्षपदी माजी आमदार राजेश टोपे यांच्या गटाकडून सौ. निर्मला मरकड यांची सर्वानुमते निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रावसाहेब दानवे व आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार राजेश टोपे हे आमदार खोतकर यांच्या दर्शना बंगला येथे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

या घडामोडीकडे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचा राजकीय संदेश म्हणून पाहिले जात असून, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आणि समन्वय वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षपदी आणि सौ. निर्मला मरकड यांच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
जालना जिल्हाच्या विकासासाठी राजकीय मतभेत बाजूला ठेवून एकत्र आलो आहे अशी प्रतिक्रिया दोघांच्या वतीने देण्यात आली. या वेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : सय्यद इलियास: 8308302662





