
जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास मो.7038232865
जालना जिल्ह्यातील सेवली येथे लोकशाही टाईम्स न्यूज च्या वतीने आयोजित “गावाकडची बातमी” या विशेष सत्रात जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास यांनी गावातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांची थेट मुलाखत घेतली. या संवादात शेतकरी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी शासनासमोर आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्या व समस्या स्पष्टपणे मांडल्या.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या : तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी – शेतकरी वर्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेले कर्जाचे ओझे हलके करण्यासाठी सरकारने तात्काळ कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. बँकांच्या वसुली नोटिसांवर कारवाई – अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पीकहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असताना बँका कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत – अनुदान व कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, जेणेकरून दिवाळीच्या तोंडावर शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर : या विशेष संवाद सत्रात ज्ञानेश्वर माऊली शेजूळ (किसान मोर्चा नेते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष) समाधान वाघमारे (भाजपा तालुका अध्यक्ष), राजू मुळे, ठाकरे, डाके, वाघ, बबन म्हेत्रे यांच्यासह सेवली गावातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावकऱ्यांचा सरकारला इशारा : ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, जर शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकरी वर्गाने सातत्याने भोगत असलेल्या संकटांचा विचार करून शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वानुमते भूमिका यावेळी व्यक्त झाली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य : लोकशाही टाईम्स न्यूजच्या या विशेष सत्रामुळे सेवली गावातील शेतकऱ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संवादातून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या भावनांना चालना मिळाली असून गावाच्या समस्या आता जिल्हा तसेच राज्य पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या संवाद सत्राने पुन्हा एकदा अधोरेखित केले की शेतकरी हा देशाचा कणा असला तरी त्याला न्याय मिळण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे.





