
जालना तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विकासराव पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त ग्रामस्थांना साखर वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या गोड उपक्रमामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमादरम्यान सरपंच विकासराव पालवे यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा देताना सांगितले की, “पिंपळवाडी गावात विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा हेतू आहे. गावासंदर्भात विविध महत्त्वाच्या विकासकामांचा आराखडा तयार केला असून त्या दिशेने मी सातत्याने कार्य करीत आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते बांधकाम, ग्रामविकास निधीचा प्रभावी वापर, शिक्षण व महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात योजनाबद्ध काम सुरू आहे.”

ग्रामपंचायत ही केवळ प्रशासनिक यंत्रणा नसून ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे एक कुटुंब आहे. गावाचा विकास हा ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, म्हणून प्रत्येक नागरिकाचा हातभार या प्रवासात आवश्यक आहे.”या साखर वाटप उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, सरपंच आणि ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले. “दरवर्षीप्रमाणे यंदाही सरपंच पालवे यांनी सर्वांच्या घरी गोडवा आणला. त्यांच्या पुढाकारामुळे गावात ऐक्य, विकास आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महिला बचतगट, युवा मंडळ व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि सरपंच विकासराव पालवे यांच्या लोकाभिमुख व विकासाभिमुख उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळवाडी गाव विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे.
स्थळ: पिंपळवाडी, ता.जालना, जि. जालना







पिंपळवाडी गावात दीपावलीनिमित्त साखर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला पिंपळवाडी : आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत पिंपळवाडी यांच्या वतीने गावातील जनतेची दीपावली गोड व आनंददायी व्हावी या हेतूने 50 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मा. जि.प. सदस्य भानुदासराव पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकास पालवे यांच्या नियोजनातून करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश महाराज इलग (पास्टा) व संतोष काळे (पास्टा) हे उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक कुंडलिकराव पालवे, साहेबराव पालवे, भगवान पालवे, गजानन पालवे, शिवाजी पालवे, संतोष पालवे, बद्री पालवे, विजय इलग, राहुल पालवे, वैभव पालवे आदींची उपस्थिती लाभली.या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व ग्रामस्थांनी या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कुटुंबांना आनंदाने सण साजरा करण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी पालवे कुटुंबाचे आभार मानले.





