Homeराजकीयजालना जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नवीन दम — संजय खंदारे,...

जालना जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नवीन दम — संजय खंदारे, रमेश सदावर्ते आणि कैलास पवार यांचा जाहीर पक्षप्रवेश

जालना : सेवली (ता. जालना) येथील प्रतिष्ठित व जनसंपर्क असलेले राजकारणी संजय खंदारे, रमेश सदावर्ते आणि कैलास पवार यांनी आज मोठ्या उत्साहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेना उ.बा.ठा पक्षाला स्थानिक पातळीवर बळकटी मिळणार आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना (उ.बा.ठा) जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी भूषविले. त्यांच्या उपस्थितीत तिन्ही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्वजाला निष्ठा अर्पण करत पक्ष प्रवेश केला.कार्यक्रमात जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,> “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा लोकशाही, विकास आणि विचारांचा पक्ष आहे. पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात खरी शिवसेना पुन्हा उभी राहत आहे. आज पक्षात सहभागी झालेले कार्यकर्ते निश्चितच पक्षाला अधिक बळ देतील.”

या प्रवेशामुळे जालना सेवली परिसरातील शिवसेनेला नवे बळ आणि नवचैतन्य मिळाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular