ASK मल्टिसर्व्हिस – टाटा सोलार स्टॉलला आमदार अर्जुन खोतकर यांची भेट; सोलार उर्जेसाठी जालनेकरांचा वाढता उत्साह”

0
80

ASK मल्टिसर्व्हिस – टाटा सोलार स्टॉलला आमदार अर्जुन खोतकर यांची भेट; सोलार उर्जेसाठी जालनेकरांचा वाढता उत्साह”

जालना : क्रेडाई जालना आणि दिव्यमराठी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रॉपर्टी एक्स्पो 2025 मध्ये प्रॉपर्टी, घरे, रोहाऊस, बंगले, व प्लॉट्सच्या आकर्षक डील्स सोबतच या एक्स्पोचे विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे ASK मल्टिसर्व्हिस – टाटा सोलार चा स्टॉल.सोलार उर्जा ही काळाची गरज असून, पर्यावरणपूरक तसेच किफायतशीर उपाय म्हणून नागरिकांची वाढती पसंती या स्टॉलमध्ये दिसून आली. शहरासह ग्रामीण भागातील अनेक इच्छुक ग्राहकांनी सोलार साहित्य, विक्री, सेवा व उभारणी याविषयी उत्स्फूर्तपणे चौकशी केली.आज एक्स्पोमध्ये आमदार अर्जुन खोतकर यांनी विशेष भेट देऊन टाटा सोलार स्टॉलला भेट दिली व सोलार उर्जेच्या प्रसाराला चालना देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. या भेटीमुळे स्टॉलला अधिक प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांमध्ये विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले क्रेडाई जालना चे चेतन मराठे, सागर अग्रवाल, अविनाश भोसले, इंजि हुशे, विष्णू पाटेकर, ASK टाटा सोलार चे स्वप्नील कोकाटे, अधिराज कोकाटे, अमोल शिंदे, पवन सुर्वे, सिद्धी तांबट,सुशील पितांबरे यांचेसह क्रेडाई व दिव्यमराठी चे सदस्य उपस्थित होते.ASK मल्टिसर्व्हिस – टाटा सोलार जालना जिल्ह्यात अग्रगण्य ठरले असून, “एकदा खर्च, रोजची बचत” या तत्त्वावर आधारित सोलार सेवा नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने ऊर्जा-क्रांती घडवत आहेत.एक्स्पोमुळे जालना व परिसरात सोलार उर्जेच्या विक्रीत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here